ओबीसी चळवळीचे नेते मा.आमदार ढोले साहेबांचे निधन

0
6

अमरावती,दि.६-ओबीसी चळवळीचे खंदे समर्थक मंडल आयोगासाठी लढा देणारे ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीसह न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे चांदुर रेल्वेचे माजी आमदार पांडुरंगजी ढोले यांचे आज(दि.६) सकाळच्या सुमारास तिवसा येथे जात अससताना त्यांच्या वाहनाला अपघात होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. तिवसा तालुक्याती कुर्हा येथे चारचाकी वाहनाने ते जात असताना वळणरस्त्यावर नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला आदळळ्याने ते गंभीर जखमी झाले होते.लगेच अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.डॉ.ढोलेच्या मृत्युने विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संयोजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे,राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसवेंदना व्यक्त करीत श्रध्दांजली वाहिली.