सामाजिक समतेची जाणीव सर्वांनी करुन घ्यावी- राजेश पांडे

0
22

गडचिरोली दि.८–: शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या दुर्बल घटकातील लोकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने विविध लोकाभिमूख योजना राबवित आहे. सदर योजनांची माहिती सामाजिक न्याय विभागाकडून नागरिकापर्यंत पोहचावे, यासाठी या सामजिक समता सप्ताहाचे आयोजन केले आहे. मात्र या योजना राबविणाऱ्या यंत्रणांनी सामाजिक समतेची जाणीव ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन याप्रसंगी जात पडताळणी पथकाचे उपआयुक्त राजेश पांडे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दिनांक 8 एप्रिल 2017 ते 14 एप्रिल 2017 या कालावधीत सामाजिक न्याय विभागाव्दारे डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवनात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पांडे बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, फुले आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक यादव गहाणे, इतर मागास वर्ग महामंडळाचे व्यवस्थापक एस.पी. बावनकर, सहाय्यक नगरधने प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, प्राध्यापक यादव गोहणे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक विनोद मोहतुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सारंग गावंडे यांनी मानले.