सालेबर्डीशिवारात काळवीटचा मृत्यू

0
11

भंडारा,दि.28 : पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने निघालेला एक काळवीटाचा सालेबर्डी शिवारातील डबक्यातील चिखलात पाय फसल्यामुळे मृत्यू झाला. त्यापूर्वी काळविट चिखलात फसून असल्याची माहिती पोलीस पाटील पोमराज लेंडे यांनी वनविभागाला देऊन अधिकारी वेळेत न आल्यामुळे या काळविटाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

सालेबर्डी गावानजिक असलेल्या पुलाच्याकडेला पाण्याने भरला डबका असल्याने काळविट पाण्याशेजारी आले. त्या काळविटाने तहान तर भागविली पण तो त्या डबक्यामधील चिखलात फसला गेला. दवडीपार बेला येथील पोलीस पोमराज लेंडे मित्राच्या शेतावर गेले असता एक काळविट चिखलात फसून पडल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील पोमराज लेंडे मित्र भगवान मते, राजू मते यांना घेवून सालेबर्डी नजीकच्या पुलाशेजारी गेले. त्यांनी चिखलात रुतलेला काळविट निघण्यासाठी धडपड करीत असल्याचे पाहिजे. लगेच पोलीस पाटील पोमराज लेंडे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात कळविले. पण, भंडारा पोलिसांनी वन विभागाला माहिती दया असा सल्ला दिला. लगेच वनविभाग भंडारा यांना घटनेची माहिती दिली. पंरतु वन विभागाचे अधिकारी उशिरा त्या ठिकाणावर आले. अधिकारी आले तेव्हा फार उशिर झाला होता. तोवर काळविट चिखलात रुतून मृत झाला होता.