भाजप माजी जिल्हाध्यक्ष अग्रवालांची बाजार समिती उपसभापती ठाकरेंंना मारण्याची धमकी

0
10

गोंदिया,दि.२६- गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या यार्डात स्थानातरणाला घेऊन आज शुक्रवारला  जिल्हाधाकारी कार्यालयात आमदार डाॅ.परिणय फुके यांनी आयाेजीत केलेल्या बैठकीत गाेदिया बाजार समीतीचे उपसभापती धनलाल ठाकरेसंह काही संचालक मंडळीना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी एका बातमीचा विषय घेऊन मारण्याची धमकी दिल्याची घटना आज 4 वाजता दरम्यान घडली.यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे,उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,जिल्हा उपनिंबधक संदिप जाधव,बाजार समितीचे सचिव जोशी व संचालक यांच्यासह इतर अधिकारी होते.

ही घटना घडताच जिल्हाधिकारी बैठक सोडून गेले तर आमदार फुके यांनी त्याचवेळी अग्रवालांना समज देत हे योग्य नसल्याची भूमिका स्पष्ट केली.या प्रकारामुळे राजकीय नेत्याची परिपक्वता समोर आली असून या घटनेला घेऊन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.घटनेच्यावेळी तीन चार अधिकारी सुध्दा हजर होते.संचालक पंकज यादव ,सुरेश अग्रवाल,तिर्थराज हरिणखेडे,आनंद तुरकर,विठोबा लिल्हारे,सावलराम महारवाडे,विजय उके यांनीही ही बैठक बाजारसमिती संचालक,व्यापारी व अडतीया़ची आहे तुमचे काय काम म्हणत त्यांनी वापरलेल्या शब्दावर कडक आक्षेप नोंदविला.संचालकांनी मात्र आमदार परिणय फुके यांनी आमची बाजू एकून घेत झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी दर्शवल्याचे सांगितले.आता हा विषय मुख्यमंत्र्याकडे जातो की नाही याकडे लक्ष लागले आहे.