शिवार सवांद यात्रेच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क-आ.विजय रहांगडाले

0
11

तिरोडा,दि२६ मे-: तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी आज शुक्रवार (दि.२६) मतदारसंघात येणार्या गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथे शिवार सवांद यात्रेतंर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेती संबंधी कृषी निविष्ठा व दर्जेदार बीज बियान्यांचा वापर पुरविणे, कृषी कर्ज व पिक विमा आदि विषयांवर शेतकऱ्यांशी चर्चा करुन शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.तसेच भाजप सरकारने “शाश्वत शेती – समृध्द शेतकरी” अंतर्गत बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचल्याची माहिती देत गावाच्या समस्या निकाली काढून गावातील विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे विचार तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ.विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले,नगराध्यक्ष अशोक इंगळे,माजी आमदार हेमंत पटले, बालाभाऊ अंजनकर,चिंतामन रहांगडाले, सभापती छायाताई दसरे, धानेंद्र अटरे, गुड्डू लिलहारे,सुरेश पटले ,अजाबराव रिणाईत, महेंद्र बघेले, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,तहसीलदार रवींद्र चौहान यांच्यासह आदी मान्यवर,शेतकरी – शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.रहांगडाले शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले कि, कर्ज माफी संदर्भात भाजप सरकार कडून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतीचे उत्पादन खर्च कमी करून व शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पन्न्‍ा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने पुढील काळात “उन्नत शेती – समृध्द शेतकरी अभियान” राबविण्याचे ठरविले आहे. शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. तसेच पिकांच्या होणाऱ्या नुकसानी पासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पिक विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे.मतदारसंघात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भूजलपातळी वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही, आणि एक पिक घेणारा शेतकरी दुबार पिक घेत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील नाले, बंधारे, यांचे खोलीकरण झाले की नाही याची खात्री करुन घ्यावी. यंदाच्या खरीप हंगामासाठी धान बियांनासह अन्य बियांण्याचा परियाप्त साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे असे आवाहन हि आ.विजय रहांगडाले यांनी यावेळी केले