शरद पवार यांनी NDA मध्ये येऊन राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हावे : आठवले

0
5

नागपूर दि.27: माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये यावे आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावे, असे आवाहन करत केंद्रीय मंत्री रामदाव आठवले यांनी भारतीय जनता पक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदी निवडून आणेल, असा विश्‍वास व्यक्त केला.पत्रकारपरिषदेत बोलताना आठवले म्हणाले, “देशाचे संविधान बदलले जाणार अशी टीका काँग्रेस करत आहे. मात्र मला तसे अजिबात वाटत नाही. सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आमचा विश्‍वास आहे.’