कर्जमाफीआधी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा- राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ

0
17

गडचिरोली,दि.07- राज्यात सध्या जोरात सर्वत्र सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांचा संपाला शेतकरी वर्गासोबतच सर्व पक्षाकडून पाठिंबा मिळत आहे.या आंदोलनात शेतीमालाला उत्पन्न खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा असा हमीभाव जाहीर करणे,स्वामिनाथन आयोग शिफारसाची अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे सातबारा कोरा करणे व या पुढे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे, शेतीला मोफत वीज पुरवठा व पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांनी सुचवलेली शेती उत्पन्न पीक योजना लागू कराव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे.त्यातच सरकारने 31 आक्टोंबरपर्यंत कर्जमाफी करु असे आश्वासन दिले असले तरी सरकारने कर्जमाफीच्या आधी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अमलबाजवणी करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रुचित वांढरे यांनी केली आहे.

निवेदनात स्वामिनाथन आयोगाचा उल्लेख करताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल, बाजाराच्या चढउतारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे याकरिता मूल्य स्थिरता लागू होईल , दुष्काळ व इतर आपात्कालीन बचावापासून कृषी आकस्मिक निधीची स्थापना होईल. समप्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व्यवस्थेत बदल घडवून येतील अशा अनेक शिफारसी  स्वामींनाथान आयोगात आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याआगोदर  स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी  सरकारने करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाची जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे सबत तुषार वैरागडे , राहुल भांडेकर , अतुल वाढई , चेतन शेंडे , बादल गडपायले , नयन कुनघाडकर , शुभम भस्मावर , साईनाथ जेंघटे , प्रीतम ठाकरे , पंकज खोबे श्रीकांत मूनघाटे , आकाश सोनटक्के , समीर आभारे , तुषार कुनघाडकर व शुभम कोठारे यांनी केली आहे