पावसाळ्यात नागरिकांनी सतर्कता बाळगा-महावितरण

0
13

गोंदिया,दिय ८ जुन :- महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे वीज ग्राहकांना कळविण्यात येत आहे की, पावसाळ्यात येणा-या वादळ, वारा, पाट्टस यामुळे महावितरण कंपनीचे लघुदाब, उच्चदाब वाहिणीचे तार तुटने/पोल पडणे ईत्यादी प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे तुटलेल्या तारांना/पोलला स्पर्शकरणे धोकादायक आहे. तसेच महावितरण कंपणीच्या कोणत्याही लाईन, तार, पोल, स्टे ईत्यादीला स्पर्श करणे सुद्धा धोकादायक आहे, त्यामुळे सर्व जनतेला विनंती करण्यात येते की, तुटलेल्या तारांना/पोलला किंवा इतर लाईन, तार, पोल, स्टे ईत्यादीला स्पर्श करू नये व शेतात व इतरत्र जातांना/जनावरे नेतांना तुटलेल्या तारांना/पोलला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी,असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
तसेच तुटलेले तार/पोल आढळल्यास वीज ग्राहकांनी/नागरिकांनी आपल्या क्षेत्रातील लाईनमनला त्वरीत सुचना द्यावी अथवा खालील दिलेल्या दुरध्वनीवर माहिती द्यावी. वीजेसंबंधी कुठलीही तक्रार असल्यास त्याची माहिती महावितरणच्या २४ तास सुरू असलेल्या १८००२३३३४३५, १८००२००३४३५ या कॉल सेंटर नंबर वर द्यावी, असे महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे कळविण्यात आले आहे.