शेतकरी सक्षमीकरणानंतरच देश ‘सुजलाम्-सुफलाम्’ – आ. फुके

0
9

गोंदिया,दि.08-जिल्ह्याची ओळख ही तलावांचा जिल्हा म्हणून असूनही या जिल्ह्याची सिंचनाची क्षमता कमी झाली होती. मात्र, आता या तलावातील गाळ काढण्याचे कार्यक्रम हाती घेतल्यानंतर व जिल्ह्यातील सर्वच तलावातील गाळ काढल्यानंतर याच तलावांची क्षमता वाढली आहे. तसेच ही तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे शेतजमिनीचे उत्पन्न वाढणार आहे. यामुळे पाणी जमिनीत जास्त मुरत असल्यामुळे जमिनीला पाण्याची कमी भासणार नसल्याचे आ. डॉ. परिणय फुके यांनी शेतशिवार संवाद यात्रा दरम्यान शेतकर्‍यांची चर्चा करताना सांगितले.
या दरम्यात शेतकर्‍यांच्या प्रत्यक्षात शेतात जाऊन पाहणी केल्यानंतर शेतकर्‍यांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक शेतकर्‍यानी शेतात एक शेततळे निर्माण करावे, जेणेकरून त्याचे फायदे शेतकर्‍यांनाच होणार आहे. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकर्‍याला दोन पिके सहज सुलभरीत्या घेता येणार तसेच जोडधंदा म्हणून मासोळीचा व्यवसाय करण्याचा पर्याय सुद्धा राहणार आहे. त्यामुळे शेतकर्‍याला सक्षम होण्यास मदत होणार असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, उपाध्यक्ष शिव शर्मा, बाळा अजंनकर, राजेश चतुर, नंदू बिसेन, छत्रपाल तुरकर, भाऊराव उके आदी उपस्थित होते.