भंडारा येथे २४ जूनला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा नियोजन बैठक

0
10

भंडारा,दि.१९- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी विद्यार्थी संघटना व तसेच ओबीसी अंतर्गत येणाèया सर्व संघटनांच्या वतीने येत्या २४ जून २०१७ शनिवारला दुपारी १ वाजता सर्किट हाऊस भंडारा येथे ओबीसी विद्यार्थी,कार्यकर्ते,पदाधिकारी,अधिकारी,शेतकरी व महिलांची बैठक आयोजित केली आहे.ओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहीर करून, केंद्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र्य मंत्रालय स्थापन करने, मंडल आयोग, नचिप्पन आयोग, स्वामिनाथन आयोग यांची सर्व शिफारसी लागु कराव्यात, ओबीसी क्रिमिलेयर ची असंवैधानिक जाचक अटी रद्द करण्यात यावे, ओबीसी कर्मचाèयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावा, ओबीसीसाठी विधानसभा व लोकसभा येथे स्वतंत्र्य मतदारसंघ निर्माण करण्यात यावा, ओबीसी शेतकèयांना वनहक्क पट्यासाठी लावलेली तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानात्मक दर्जा देण्यात यावा या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या बैठकित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे महाधिवेशन ७ आगस्ट रोजी दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशनल क्लब येथे घेण्यात आले आहे. या बाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे,राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे आदी मान्यवरा उपस्थित राहणार आहेत.तेव्हा भंडारा जिल्ह्यातील ओबीसी बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असेन राष्ट्रीय ओबीसी महासंघ संघटक खेमेंद्र कटरे, भंडारा जिल्हा संघटक डॉ.अजय तुमसरे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, जिवन लंजे, रुपेश खवास, ओबिसी सेवा संघाचे भैय्याजी लांबट,गोपाल सेलोकर, डॉ शैलेश कुकडे, माधवराव भोयर, डॉ अमित गायधने, प्रा उमेश सिंगनजुडे, गोपाल नाकाडे, प्रा अशोक गायधनी, संजय वनवे, डॉ श्रीकांत भुसारी, चोपराम तवाडे, अविनाश ब्राम्हणकर, मुनेश्वर तिघरे, बालू चुन्ने, प्रा. अरून झिंगरे,वामनराव वझाडे,प्रकाश भांडारकर, प्रदिप मासुरकर, नरेश करंजेकर, किशोर पंचभाई, जबीर मालाधारी, उमेश मोहतुरे, महेश निंबार्ते, दयानंद नखाते यांनी केले आहे.