पीडित महिला, बालकांना संरक्षणासाठी न्याय व्यवस्था कटिबद्ध – व्ही.डी. डोंगरे

0
8

राज्यातील पहिल्या सहायता कक्षाचे उद्घाटन

· विधी सल्लागार व समुपदेशनाची सुविधा

· पीडित महिलांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था

· जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

नागपूर, दि.2 : अनैतिक मानवी व्यवसायातून सोडवणूक केल्यानंतर त्यांना न्यायालयात संरक्षण तसेच निर्भिडपणे साक्ष देता यावी यासाठी पीडित महिला व बालकांसाठी विशेष तयार करण्यात आलेला कक्ष अशा महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अत्याचार पीडित महिलांना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनासोबतच न्याय व्यवस्थेचीदेखील आहे. ‘पीडित महिला संरक्षण कक्षा’ मुळे साक्षीदारांच्या संरक्षणासमवेत त्यांचे मनोबल वाढेल असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांनी आज केले.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावर विशेष तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंधासाठी ‘टेस्टा’(ट्रान्सफॉरमिंग एक्सप्लॉइटेशन ॲण्ड सेव्हींग थ्रू असोसिएशन) या विधी सेवा प्राधिकरण,महिला व बालकल्याण, पोलिस, चाईल्ड लाईनय, सेव्ह द चिल्ड्रेन आदी सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नाने टेस्टा गट नागपूर येथे प्रथमच स्थापन करण्यात आला आहे. अशा प्रकारचा उपक्रम भारतात पहिल्यांदाच नागपूर येथे सुरु करण्यात आला आहे.
यावेळी मुख्य न्याय दंडाधिकारी रत्नाकर साळगावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कुणाल जाधव, ‘सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया’ स्वयं सेवी संस्थेचे सदस्य अनिरुद्ध पाटील, ‘चाईल्ड लाईन’ स्वयं सेवी संस्थेच्या शहर समन्वयक श्रीमती अर्चना पाबिबासू भरोसा सेलच्या श्रीमती- संखे, तसेच विधीतज्ज्ञ, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, करुणा वसतिगृहाचे अधीक्षक, विधी स्वयं सेवक, समाज सेवक उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, पीडित महिलांना न्यायालयात आणल्यावर येथील मोठी इमारत, अट्टल गुन्हेगारांचा वापर यामुळे त्यांच्यावर दबाव निर्माण होतो. परंतु ‘पीडित महिला संरक्षण कक्षा’मुळे आता त्यांचे मनोबल वाढेल, त्यांना संरक्षण मिळेल, यामुळे गुन्हे तपासणीला योग्य दिशा आणि पाठबळ मिळेल. आणि अत्याचार पीडितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य कुणाल जाधव म्हणाले की, पीडित महिला संरक्षण कक्षामुळे अत्याचारग्रस्त महिलांमध्ये साक्ष देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होईल. या सुसज्ज संरक्षण कक्षामुळे पीडित महिलांना साक्षपूर्व संरक्षण तर मिळेलच परंतु माहिती पुस्तिका देखील वाचायला मिळतील. तसेच तज्ज्ञांकडून समुपदेशन आणि वकिलांचा सल्ला देखील मिळेल.यामुळे न्यायप्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अल्पावधीत पूर्ण करणे शक्य होईल आणि पीडितांना योग्य न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेचे अनिरुद्ध पाटील यांनीप्रास्ताविकात अनैतिक मानवी व्यापारामधून सोडविलेल्या मुलींना कोर्टातसादर करतांना आरोपीकडून दबाव टाकण्यात येतो. त्यामुळे त्यांना योग्यन्याय मिळत नाही. अशा आरोपीपासून पीडित महिलांचे संरक्षण व्हावे यासाठीअशाप्रकारचा कक्ष उपयुक्त आहे. कोर्टासमोर अशाप्रकारचे 345 प्रकरणे मुख्यन्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर आहेत. अशा प्रकरणांमध्येमुलींच्या मनातील भीती दूर व्हावी व त्यांनी कोर्टाला सहकार्य करावे यादृष्टीने विधी सल्लागार व समुपदेशामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.अशाप्रकारचा कक्ष राज्यात प्रथमच सुरु होत आहे.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव यांनी स्वागत केले. हा कक्ष तयार करण्यासाठी ॲड. नंदीनी ठक्कर, शुभदा संख्ये, ॲड.टावरे, चाईल्ड लाईनच्या अर्चना पाली, श्रीमती सावरकर, श्रीमतीदेशकर,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. परदेशी यांचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार अनिरुद्ध पाटील यांनी मानले.