ट्रक व बसची समोरासमोर धडक, बसचालक ठार

0
12

गडचिरोली,दि.18: ट्रक व बस यांच्या भीषण अपघातात बसचालक ठार झाल्याची घटना काल(दि.१६)रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावरील वसा(पोर्ला)गावाजवळ घडली. महादेव देशेवार असे मृत बसचालकाचे नाव आहे.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिमूर येथे चिमूर क्रांतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथून भाजपचे कार्यकर्ते परिवहन महामंडळाच्या १२ बसेसमधून गेले होते. परत येताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास वसा गावाजवळ एमएच ४० वाय ५५३६ क्रमांकाच्या बसची समोरुन येणाऱ्या एमएच ४० एके ०७५७ क्रमांकाच्या ट्रकशी टक्कर झाली. यात बसचालक महादेव देशेवार गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरमोरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.