आमगाव रूग्णालयाचा कायाकल्प;समितीने केली पाहणी

0
10

(महेश मेश्राम),आमगाव,दि.27:   महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी ‘कायाकल्प’ कार्यक्रम संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. त्या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांची पीर असेसमेंट करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा  उपजिल्हा रूग्णालय व आमगाव ग्रामीण रूग्णालयाची निवड करण्यात आली. या दोन्ही रूग्णालयांची पाहणी गडचिरोली येथील चमूने शनिवारी केली.
रूग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा, आंतररूग्ण सेवा, प्रसूती, एक्सरे, तांबीचे प्रमाण, औषध पुरवठा, आकस्मीक आरोग्य सेवा, संदर्भ सेवा अशा विविध सेवा कशा पद्धतीने दिल्या जातात. तसेच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपलब्ध असलेली साधने, रूग्णालयाचे स्वरूप, रूग्णालयात करण्यात आलेल्या भौतिक सुविधा या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याची चमू जिल्ह्यात आली होती.
शासनाच्या दिलेल्या निकषानुसार हे दोन रूग्णालय किती टक्के खरे उतरले याची पाहणी यावेळी करण्यात आली. सदर चमूने रूग्णालय परिसरात असलेल्या सर्वबाबींची काटेकोरपणे पाहणी केली. आमगाव येथे दाखल झालेल्या चमूत डॉ. चौधरी, डॉ. पंकज पटले, प्रविण यांचा समावेश होता. यावेळी आमगाव रूग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. शोभना सिंह यांनी त्यांच्या येण्यापूर्वी रूग्णालयात किती रूग्णांना उपचार दिला गेला होता. झालेल्या प्रसूती व इतर सेवा तर त्यांनी या दिड वर्षात आमगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बदलेल्या रूपाची माहिती दिली. यावेळी आमगाव तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व परिचर उपस्थित होते.