जीएसटी विरोधात कंत्राटदारांचे बांधकाम विभागासमोर आंदोलन

0
13

गोंदिया,दि.29 : केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी आज मंगळवारला गोंदिया जिल्हा कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने येथील सार्वजनिक बांधकाम विभाग(रोहयो) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशातील विकासात्मक कामात नेहमी अग्रेसर असणाºया शासकीय कंत्राटदारास जुन्या कामांना जीएसटी कर प्रणाली लावल्यामुळे १८ टक्यांचे नुकसान कंत्राटदारांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे ही जीएसटी कर प्रणाली जुन्या कामांपासून लवकरात लवकर काढण्यात यावी, अन्यथा कंत्राटदार संघटना संपूर्ण राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारेल, असाही इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.
जुन्या कामांवर दोन टक्के व्हॅटऐवजी १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे कंत्राटदारांना १६ टक्क्यांचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हा भुर्दंड कोणत्याही परिस्थिती कंत्राटदार सहन करणार नाहीत. त्याकरिता कामबंद करून उपोषण करण्याचा इशारा आनंद जैन,बंटी मिश्रा, अनिल रहागंडाले,महेंद्र बघेले,मनिष चौरागडे,,अनुप बोपचे,प्रशांत बोरकुटे,संतोष भेलावे,जगदीश लालवानी,शाम चंदनकर,नुतन सोनावने,सैलेश जायस्वाल,दिनेश कोडवानी,सुनिल येवले,अजय टाह,नितिन मेश्राम,रवी भरणे,उमेश कापसे,संतोष पुरोहित,किरण बिसेन,तांजेद्र हावडा,हितेश बिसेन,सुधीर मानकर,विमल असाटी,आदित्य प्रमर,महेंद्र गाडे,राहुल फेंडारकर,छगन पंजारे,पारस कटकवार,सुरेश पटले,टुलेंद्र कटरेकैलास गौतम,राजीव शेळके,भरत पाटील,बाळा ठवकर,अनुप कटरे,असलम गोडील आदी कंत्राटदार सहभागी झाले होते.