तालुका खरेदी विक्रीच्या आमसभेत तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्याचा ठराव पारीत

0
10

गोरेगाव,दि.२०- येथील गोरेगाव तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्यावतीने गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवार(दि.१८)ला आयोजित आमसभेत गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासोबतच शेतकèयांचे कर्ज सरसकट माफ करण्यावर सभासद शेतकèयांनी चर्चा करीत ठराव एकमताने पारीत केला.तसेच तालुका खरेदी विक्रीच्या धान खरेदी केंद्रावर कुठल्याही शेतकèयाला धान विक्री करण्यापासून शासनाने व जिल्हा मार्केqटग अधिकाèयांने बंदी घालून मानविअधिकाराचे हनन करण्यात येऊ नये असे विचारही सभासदानी मांडले.संस्थेचे सभापती डॉ.झामqसह बघेले यांच्या अध्यक्षस्थेखाली पार पडलेल्या आमसभेला पी.जी.कटरे,कुवरलाल कटरे,डेमेद्र रहागंडाले,खेमेंद्र कटरे, श्रीप्रकाश रहांगडाले, जितेंद्र कटरे, खिरीचंद येळे, मानिकचंद बिसेन,जयवंता पटले, याचना काठेवार,लहू मेश्राम आदी संचालक उपस्थित होते.संस्थेचे व्यवस्थापक नुतनलाल रहागंडाले यांनी संस्थेचा लेखा जोखा सादर करीत संस्था तोट्यात चालत असल्याची माहिती सभासदांना दिली.आमसभेला उपस्थित असलेले सदस्य ओकांरलाल शरणागत,जगदिश येरोला,श्री ठाकूर,गिरधर बिसेन,डॉ.किशोर गौतम,हि.द.कटरे,छोटूभाऊ रहागंडाले,देवचंद कुभलंकर,महाप्रकाश बिजेवार,संतोष नागनाथे,भोजराज बारेवार आदींनी आमसभेत विचार व्यक्त केले.येरोला यांनी संस्थेच्या धान खरेदीचा व्यवहार हा पारदर्शक असायला हवा असे सांगितले.तर शरणागत यांनी मृत सभासदांच्या वारसांना सदस्यता देण्यावर चर्चा केली.तसेच ज्यांच्यावर जुनी थकबाकी संस्थेची आहे,त्यांच्याकडून ती रक्कम कायदेशीररित्या वसुल करण्यावरही भर सदस्यांनी सहमती दिली.आमसभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.