‘जेम’ पोर्टलवर शासकीय खरेदी बंधनकारक

0
16

गडचिरोली दि.26- येणाºया काळात सर्व प्रकारची शासकीय खरेदी ‘जेम’ या शासकीय पोर्टलद्वारे होणार आहे. त्यामुळे त्याचे आकलन करुन घ्यावे व त्याबाबत असणाºया सर्व नियमांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले.‘जेम अर्थात’ गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस या संकेतस्थळाचा स्विकार महाराष्ट्र शासनाने केला आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुखांना प्रशिक्षण देण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यशाळेत त्यांनी माहिती दिली.
कार्यशाळेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व या विषयातील तज्ज्ञ कृष्णा रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस. तिडके, सागर पाटील, जिल्हा लेखाधिकारी कंगाली, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शासनस्तरावर यापूर्वी कार्यालयांमधून विविध पद्धतीने कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख तसेच शासन स्तरावर खरेदी करण्यात येत होती. त्यात बदल करीत शासनाने ई-निविदा पध्दती सुरु केली. त्याचे यापुढील पाऊल आहे.  ‘जेम’ यात देशपातळीवर सर्व स्तरातील विक्रेते निविदा प्रक्रियेत सहभागी होवू शकत असल्याने स्पर्धा चांगली होऊन उत्तम उत्पादन, रास्त दरात मिळण्यास मदत होणार आहे. ई-मार्केटप्लेस राज्यसरकारी कार्यालयांना बंधनकारक करणारा शासन निर्णय २० आॅगस्ट रोजी निर्गमित केला आहे. यामुळे याबाबत सर्वच कार्यालय प्रमुखांना याची माहिती असणे आवश्यक झाले असल्याने या कार्यशाळेत पॉवर पॉईंन्ट सादरीकरणाव्दारे सर्व बाबींची माहिती देऊन सर्वांना प्रशिक्षीत करण्यात आले.