खोडशिवनीत भूमिगत रेल्वे पुलाविरोधात नागरिकांचे आंदोलन,खा.पटेलांची हजेरी

0
32

सडक अर्जुनी,दि.०९-गोंदिया- चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी हे रेल्वेस्थानक असून याठिकाणी असलेल्या चौकीवरून वाहतुक बंद करुन ती भूमिगत पूलाखालून सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने भूमिगत रेल्वे पूलाच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली.या पुलाच्या विरोधात जवळपासच्या २५ गावातील नागरिकांनी एकत्र येत गांधी जयंतीच्या दिनी आंदोलन केले.विशेष म्हणजे या आंदोलनात खासदार नाना पटोले हे सुध्दा सहभागी झाले.ज्या मार्गावर भूमिगत पूल तयार करण्याचा बेत रेल्वेने आखला त्या मार्गावरुन दररोज राज्यपरिवहन विभागाच्या बसचा प्रवास असतो तसेच साकोलीला जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असल्याने मोठी वाहने सुध्दा या मार्गावरुन शेकडोच्या संख्येने ये जा करतात अशा परिस्थितीत जर भूमिगत पूल तयार करण्यात आला तर तिथून बससह इतर मोठे वाहन जाऊ शकणार नाही व नागरिकांची अडचण होणार आहे.सोबतच पावसाळ्यात अशा भूमिगत पुलामध्ये पाणी साचून राहत असल्याने रहदारी बंद होत असल्याचे या मार्गावरील अनेक भूमिगत पुलाकडे बघितल्यास दिसून येते त्यामुळे याठिकाणी भूमिगत पूल तयार न करता रेल्वेने उड्डाणपूल तयार करावा असे खा.पटोले यांनी म्हटले आहे.कंत्राटदाराला पोसण्यासाठी काम करु नये असेही पटोले यांनी म्हटले आहे.यावेळी सरपंच अर्चना भैसारे,पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर,उपसरंपच उमराव कापगते,डॉ.बी.आर.वाढई आदी उपस्थित होते.