गडचिरोली आगारातील राठोड यांच्या मनमानी कारभारामुळे चालक-वाहक त्रस्त

0
10

गडचिरोली,दि.12 : गडचिरोली आगारातील अलोकेशन प्रमुख सुभाश राठोड यांच्या मनमानी कारभारामुळे चालक – वाहक त्रस्त असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे चालक – वाहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या चालक – वाहकांकडून होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातील अलोकेशन प्रमुख सुभाष राठोड यांच्या मनमानी कारभारामुळे आगारातील चालक – वाहक यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्यांच्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत आहे. नुकताच १० आॅक्टोबर रोजी आगारातील चालक भैय्या महाजन यांना साप्ताहिक सुट्टी असतांनाही त्यांना अलोकेशन प्रमुख राठोड यांनी बाकायदा चालक/ वाहकाच्या दैनंदिन कामगिरी २३ तक्त्यावर  मानपूर या नियतावर कामगिरी प्रदर्शित करुन सदर चालकाला साप्ताहिक विश्रांतीच्या दिवशी कामगिरी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे राज्य परिवहरन महामंडळाचे गडचिरोली आगाराच्यावतीने जवळपास २ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगारातील आणीबाणीची परिस्थिती नसतांनाही अलोकेशन प्रमुख राठोड यांनी स्वतःचा आर्थिक हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक महाजन या वाहन चालकास साप्ताहिक विश्रांतीच्या दिवशी कामगिरी देवून महामंडळाचे २ हजाराचे रुपयाचे आर्थिक नुकसान केले. सदर बाब आगारातील चालक/वाहक पसरताच सुभाष राठोड यांच्यावर राज्य परिवहन न्यायप्रणालीनुसार कार्यवाही करण्याची मागणी चालक/ वाहकांकडून होत आहे. मध्यवर्ती कार्यालयामतुन निघालेल्या पत्रानुसार वाहकांच्या नकळतपणे झालेल्या चुकीसाठी दंड त्यांच्याकडून वसूल केले जाते. या नियमाप्रमाणे आगारातील अलोकेशन प्रमुख राठोडयांनी तर जाणीवपूर्वक स्वतःचे आर्थिक स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने सदर कार्य केल्याचे दिसून येते. त्यांच्या या मनमानी कार्यप्रणालीमुळे राज्य परिवहन महामंडळाला २ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अलोकेशन प्रमुख राठोड यांच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे आगाराच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. खुद्द एसटी महामंडळाच्या आगार अलोकेशन प्रमुखाकडून आगाराच्या नियमाचे उल्लंघन झाले असल्यामुळे त्यांच्या राज्य परिवहन न्यायप्रणालीनुसार २ हजार रुपयाचे ३०० पट याप्रमाणे ६ लाख रुपयो रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात यावे, अशी मागणी आगारातील चालक/वाहक यांच्याकडून केली जात आहे.