भाजपातर्फे धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा

0
15
गोंदिया,दि.१४ : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडीतर्फे १४ आॅक्टोबर रोजी ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. येथील आंबेडकर चौकात पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच सर्व बौद्ध बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर, तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला अभिवादन करून बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने, भाजपा अनुसूचित जाती आघाडी प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, रतन वासनिक,विरेंद्र जायस्वाल, नगरसेवक भरत क्षत्रीय, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, जयंत शुक्ला,  प्रदिपसिंग ठाकूर, अजित मेश्राम, नगरसेविका अफसाना पठाण मुजीब पठाण, धनंजय वैद्य, श्याम चौरे, संजय मुरकुटे, अमित झा,  बाबुलाल पंचभाई, चंद्रभान तरोणे, मिलिंद बागळे, राजा कदम, राजेश बघेल, वसंत गणवीर, आशा जैन, महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पालकमंत्री कार्यालयातही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत गौतम बुद्ध व भारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला अभिवादन केले.