चंद्रपूर व बल्लारपूरात ओबीसींना क्रिमिलेयरमधून वगळण्याचे निवेदन

0
17

चंद्रपूर,दि.26ः- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने चंद्रपूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी व बल्लारपूर येथे तहसिलदारांना निवेदन सादर करुन ओबीसींवर लादलेली असैवंधानिक क्रिमिलेयरची अट कायमस्वरुपी रद्द करण्यासंबधीचे निवेदन सादर करीत आक्षेप नोंदविण्यात आले आहे.निवेदनात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दि. २८ ऑक्टोबर २०१४ रोजी अहवाल क्रं ४९ शासनास सदर केला असून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील यादी क्र १ व २ (परीशीष्ट अ) मध्ये अनुक्रमे विमुक्त जाती (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या १४ जाती ( यादी क्र. १), भटक्या जमातीच्या (ब) यादीमध्ये समाविष्ट असलेल्या २३ जाती व विमाप्र प्रवर्गातील अनुक्रमांक ७ व वरील १ जात ( यादी क्र. २) क्रिमिलेअर तत्वा मधून वगळण्याची शिफारस केली आहे.त्याचे आक्षेप सहसचिव विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभाग,यांनी मागविले होते.त्यानुसा आज दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात आक्षेप अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आक्षेप नोंदविण्यात आले. महाराष्ट्र राज्यात इतर मागास वर्गात ३४६ जाती, विशेष मागास प्रवर्गात ७ जाती, भटक्या जमाती (अ) १४ जाती, भटक्या जमाती (ब) ३५ जाती, भटक्या जमाती (क) १ जात, भटक्या जमाती (ड) १ जात ऐकून ४०४ जाती आहेत. त्यां क्रिमिलेअर मध्ये मोडतात. कुणबी, पवार सह क्रिमिलेअर मोडणाऱ्या ४०४ जातींना क्रिमिलेअर मधून सरसकट वगळण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्याकरिता चन्द्रपूरसह चिमूर,सावली येथील पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर येथे निवेदन देतेवेळी बबनराव फंड, बबनराव वानखेडे, अविनाश पाल,अर्जुन भोयर, अरुन पाल,किशोर घोटेकर, किशोर भोयर,सूर्यभान झाडे, रवी झाडे,गणेश आवरी, स्वामी कापरबोयना,प्रवीण चवरे, विनोद भोयर,तुळशीदास भुरसे, पुंडलिक शेरकी, नितीन तोंडरे, कीर्ती रोकडे, प्रमोद उरकुडे,रवींद्र टोंगे,गणेश चितळे,अमित मोरांडे,गजानन कष्टी, संजय दुधाणकर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे राष्टीय ओबीसी महासंघ बल्लारपूर शाखेच्यावतीने तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.त्यावेळी गोqवदा पोडे,मोरेश्वर लोहे,प्रणय काकडे,रुपेश गोंदणे,देवानंद शेंडे,विलास शेंडे,अविनाश उमदाळे,राजेश पावडे उपस्थित होते.