गोंदियातील बीजीडब्ल्यू रुग्णालय ‘रेफर टू’ आजाराने ग्रस्त

0
31

रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था ‘रामभरोसे’
महिला सक्षमीकरण आणि बेटी बचाओ केवळ खानापूर्ती

गोंदिया,दि.२२ – गोंदियातील एकमेव बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय सध्या ‘रेफर टू…’ या आजाराने बाधित असून शासकीय ‘सलाईन’ वर दिवस काढत आहे. नावापुरत्या शासकीय असलेल्या या१३५ खाटांच्या रुग्णालयात महिन्याकाठी सुमारे ७००च्या वर महिलांची प्रसूती कशीबशी केली जाते. रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था तर ‘रामभरोसे’ आहे. अतिदक्षता विभाग आणि जागेचा अभाव यामुळे हे रुग्णालय कायम आजारी आहे. एकीकडे ‘महिला सक्षमीकरण’ आणि ‘बेटी बचाओ’ असे ढोल बडवले जाते तर दुसरीकडे मात्र त्याच महिलांच्या आरोग्याची हेळसांड उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत आहे. परिणामी, ‘रेफर टू…’ या आजारावर महाराष्ट्र शासन ‘लसीकरण’ करणार की नाही? असा प्रश्न नागरिकांनी फडणवीस सरकारला केला आहे.
या रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जिल्हे आणि लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून सुद्धा गरीब महिला व त्यांचे नातेवाईक प्रसूतीसाठी आणि उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. रुग्णांची वाढती गर्दी आणि अपुरी व्यवस्था यामुळे दूरवरून येणाèया गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांना धमकावून लूटमार करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या घटना साधारणपणे रात्रीच्यावेळी घडत असतात. मागील अनेक दिवसांपासून पुन्हा गंगाबाई स्त्री रुग्णालयात काही असामाजिक तत्त्वांनी मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला असून या प्रकारात दिवसेंदिवस भर पडत आहे. परिणामी,येथे वावरणारे रुग्णांचे नातेवाईक कायम दहशतीखाली असतात.
दोन वर्षापूर्वी गंगाबाई स्त्री रुग्णालयात असेच असामाजिक तत्त्व वावरत होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना धमकावून लुटणे व मारहाण करणे या घटना पुढे आल्या होत्या. दर ८ तासांसाठी एक पोलिस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केला जातो. परंतु, रात्रीच्या वेळी राहणारे पोलिस कर्मचारी गंगाबाई परिसरात गस्त न घालता आपल्या खोलीत झोपा काढत असल्याने असामाजिक तत्त्वांचे येथे चांगलेच फावते.
दोन वर्षापूर्वी चुटीया येथील मोहिनी शरणागत या तीन वर्षाच्या मुलीला पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तीन ते चार अज्ञात इसमांनी गंगाबाई येथे असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाला चाकू दाखवून धमकाविले होते. तीन ते चार अज्ञात इसम चोरी करण्याच्या उद्देशाने धर्मशाळेत वावरत असताना गंगाबाई तर्फे ठेवण्यात आलेल्या सुरक्षा सेवकांनी त्या इसमांना हटकले. त्यावर त्या सुरक्षा रक्षकांशी त्या इसमांचा वाद झाला होता. एका मोबाईल चोरी प्रकरणात सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखविल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी या घटनेची साधी दखल सुद्धा घेतली नव्हती, हे येथे विशेष.
यापूर्वी शहर पोलिसांची चमू रात्री गस्त घालायची. त्यामुळे हा परिसर सुरक्षित वाटत होता. मात्र, पोलिसांनी पेटड्ढोलिंग बंद केल्याने रुग्णालय परिसरानजिकच्या पानटपरी, चहाटपरी व पडक्या शासकीय इमारतीचा आधार घेऊन रात्रीच्यावेळी हे असामाजिक तत्त्व रुग्णांच्या नातेवाइकांना लुटण्याचा किंवा त्यांना अपाय करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारांवर अंकुश लागावे, यासाठी पोलिसांनी रुग्णालयात करडी नजर ठेवणे गरजेचे असून तशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
गंगाबाईत असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होण्याला पोलिस कारणीभूत आहेत. नागरिकांची ओरड झाल्यावर पोलिस चौकी उघडण्यात आली. मात्र, येथे दररोज रात्रीच्या पाळीत पाहिजे तेवढ्या मनुष्यबळाची नियुक्ती केली नाही. एका निःशस्त्र पोलिस कर्मचाèयाच्या खांद्यावर एवढ्या मोठ्या गंगाबाई रुग्णालयाची धुरा असते. त्यामुळे तो कर्मचारीही रात्री गस्त न घालता आपल्या चौकीत आराम करतो. गंगाबाईत पोलिस चौकी आहे. परंतु. पोलिसांचा धाक नसणारे समाजकंटक रात्रीच्यावेळी या ठिकाणी वावरत असतात.
या रुग्णालयात प्रसूती व उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर महिला रुग्ण येत असतात. या रुग्णालयाची क्षमता केवळ १३५ खाटांची आहे. त्यामुळे या रुग्णालयात दाखल रुग्णांना एकतर खाली वा दुसèया रुग्णाचे बेड शेअर करावे लागतात. साधारणपणे एका खाटेवर दोन ते तीन रुग्ण असे येथील नेहमीचेच चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे या अव्यवस्थेचा फटका प्रसूत महिला आणि शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. रात्रपाळीत भूल देणाèया डॉक्टरचा वानवा असल्याने महिला रुग्णांना अनेक वेळा त्याची किंमत मोजावी लागते. वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात आल्याने या रुग्णालयातील काही वॉर्ड हे विद्याथ्र्यांना अभ्यासासाठी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या रुग्णालयात असलेले एकमेव शस्त्रक्रिया कक्षामध्ये अव्यवस्थेचा संचार असून अतिदक्षता विभागाची कोणतीही सोय येथे उपलब्ध नाही. परिणामी, महिला रुग्णांना याचा फटका बसतो. अनेक वेळा या व्यवस्थेअभावी अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याचा इतिहास आहे. ङ्कऑल इज वेलङ्क या सरकारी धोरणामुळे अनेक गरीब रुग्णांना शहरातील इतर रुग्णालयात हलविले जाते वा त्यांना नागपूरला जाण्याचा सल्ला दिला जातो. या प्रकारामुळे रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पारदर्शक शासन आणि विकासाचे ढोल बडविणाèया आणि प्रामुख्याने ‘बेटी बचाओ’सह’महिलासक्षमीकरणा’वर मोठमोठे भाषण देणारे लोकप्रतिनिधी गरिबांच्या आरोग्याशी निगडित बाई गंगाबाई रुग्णालयाच्या आजारावर कधीतरी उपचार शोधतील का? असा प्रश्न नागरिक उपस्थित केला आहे.