राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने घेतली अंगणवाडी मदतनीसाच्या उपोषणाची दखल

0
22

गडचिरोली,दि.१ः-बाल विकास प्रकल्प (नागरी प्रकल्प ) गडचिरोली च्या कार्यायालायाद्वारे वडसा येथील सौ. शिल्पा लाडे व कु. सरिता पंधरे या दोन महिलांची निवड अंगणवाडी मदतनिस म्हणून प्रभाग क्र. १ व प्रभाग क्र. २ मधून अनुक्रमे निवड एप्रिल महिन्यात झाली.पण सात महिन्याचा कालावधी उलटूनही अजून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले नाही. आपल्यावरील अन्यायाविरोधात वडसा तालुक्यातील अंगणवाडी मदतनीसांनी पुकारलेले उपोषण राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले.हे उपोषण दि.२७ नोव्हेंबर पासून नागरी प्रकल्प कार्यालय समोर कॅम्प एरिया येथे चालू होते. राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या मध्यस्थीनंतर बाल विकास प्रकल्प (नागरी प्रकल्प) अधिकारी गडचिरोली, यांनी विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास नागपूर विभाग नागपूर येथे अपील दाखल करण्यास सांगितले. तत्पूर्वी बाल विकास कार्यालय किंवा कोणत्याही संघटनेने उपोषणाची दाखल घेतली नव्हती.बाल विकास प्रकल्प (नागरी प्रकल्प) अधिकारी गडचिरोली यांनी दिलेल्या पत्रानुसार सदर जागा रद्द झाल्याने त्या पदाची भरती प्रक्रिया हि आपल्या स्तरावरून होत नसल्याचे सांगितल्याने 30 दिवसाचे आत विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास नागपूर विभाग नागपूर येथे अपील दाखल करण्यास सांगितले.त्यानंतर उपोषण मागे घेण्याची विंनती केली,राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोलीच्या पदाधिकार्यांनी या सर्व प्रकरणाची पडताळनी केली,त्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले . या वेळी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरजभाऊ डोईजड, किरणभाऊ  कटरे,करण ढोरे,विपुल मिसार,शुभम चापले, पंकज खोबे इत्यादी उपस्थित होते