सौरयंत्राचा निधी रखडला

0
17

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात कासावीस झालेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वनविभाग, वनक्षेत्रात पाणवठे, विंधनविहिरी आणि कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. परंतु निधी अभावी सौरऊर्जा संयत्रणेचे काम अपूर्ण आहे.

दोन वर्षापूर्वी ३६ विंधनविहिरी सौरऊर्जा संयत्रणेने परिपूर्ण करण्याचे ठरविले होते. प्रादेशिक वनविभागाच्या १२ वनक्षेत्रात याची अंमलबजावणी करून २० विंधन विहिरीवर ही यंत्रणा बसविण्यात आली. उर्वरित विंधनविहिरींवररुन वनमजुराच्या मदतीने पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यांच्यासाठी हे कठीण कार्य असल्याने या विहिरीच नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांचा पाणीप्रश्न अधिक भयावह होण्याची चिन्हे आहेत. ४५ लाखांचा निधी या संयत्रणेसाठी मेडा या योजनेमधून खर्ची घातला गेला. आता निधी मिळण्यासाठी वनविभागाने शासनाकडे बोट दाखवून या विषयावर पांघरुन घातले आहे. पाणवठ्याच्या माध्यमातून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, वनविभागातर्फे जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाच्या माध्यमातून डावी-कडवी विचारसरणी अंतर्गत २०१२-१३ या आर्थिक वर्षात ३९ लाख ९६ हजार रुपये निधी खर्च करुन ३६ विंधनविहिरींची निर्मिती करण्यात आली. त्यावर मजुरांच्या माध्यमातून पाणी उपसा करण्याचे काम करण्यात येत होते.

दरम्यान, याच कालावधीत या विंधनविहिरींवर व जुन्या काळातील साध्या विहिरींवर मेडा रेट कन्स्ट्रक्शन अंतर्गत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण नावीण्यपूर्ण योजनेतून सौरपंप लावण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ४५ लाख रुपये निधीतून गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध, सडक अर्जुनी, देवरी उत्तर, आमगाव, तिरोडा या वनपरिक्षेत्रात प्रत्येकी दोन तर सालेकसा, देवरी दक्षिण, गोठणगाव, चिचगड या वनपरिक्षेत्रात प्रत्येकी एक अशा २० विंधनविहिरींवर सौरपंप लावण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्याचे जंगलक्षेत्र पाहता वन विभागाचे २९७ बिट आहेत. १६ विंधनविहिरींवरही हे संयत्र लावणे गरजेचे असताना उर्वरित क्षेत्रात वनमजुरांची ओरड वाढली आहे.