शेतमालाची खरेदी-विक्री बाजार समितीत करावी-अविनाश पाल

0
7
सावली,दि.8ः-येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सावली व उपबाजार व्याहाड खुर्द येथे शेतमालाचा नियमीत खुल्या बाजाराचा शुभारंभ  07 डिसेबंरला समितीचे मुख्य प्रशासक अविनाश पाल यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे अर्थ, नियोजन व बांधकाम सभापती  संतोष सा. तंगडपल्लीवार करण्यात आला.यावेळी बोलतांना पाल म्हणाले की सर्व शेतकरी, मापारी, अडते व व्यापारी यांनी तालुक्यात कुठेही अवैध शेतमालाची खरेदी -विक्री करू नये, शेतक-याच्या हितासाठी संपुर्ण शेतमाल हा खुल्या बाजारातच आणुन खरेदी -विक्री करावी जेणेकरून यामध्ये कुणाचाही फसवणुक होणार नाही.आपल्या बाजार समितीचे उत्पन्न वाढवुन मिळणा-या उत्पन्नातून शेतक-यांच्या हितासाठी बाजार समिती काम करणार असल्याचे म्हणाले. संतोष सा. तंगडपल्लीवार, योगिताताई डबले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला  उद्घाटक म्हणून सभापती संतोष सा. तंगडपल्लीवार ,विनोद गड्डमवार उपमुख्य प्रशासक, सौ. छायाताई शेंडे सभापती पं.स.सावली, सौ. योगिताताई डबले सदस्य जि. प.चंद्रपुर, सौ. मनिषाताई चिमुरकर सदस्य जि. प. चंद्रपुर, सतिष बोम्मावार महामंञी गणपतजी कोठारे सदस्य पं.स. सावली, रविद्र बोलीवार सदस्य पं. स. सावली, अरूण पाल प्रशासक, अर्जुन भोयर प्रशासक, भुवन सहारे प्रशासक, दिलीप ठिकरे प्रशासक, सुधाकर गोबाडे प्रशासक, ढिवरू कोहळे प्रशासक, रवि साखरे प्रशासक, अशोक नागापुरे प्रशासक, पुनम झाडे प्रशासक,  शरद सोनवाने प्रशासक, सौ. पुष्पाताई शेरकी,सचिन तंगडपल्लीवार व गुरुदेव भुरसे प्रशासक, प्रतिभा बोबाटे, बहुसंख्य शेतकरी, व्यापारी, अडते व मापारी उपस्थित होते, संचालन व आभार प्रदर्शन समितीचे सचिव नरेश सुरमवार यांनी केले.