अनु.जाती युवक-युवतींसाठी बार्टीच्या प्रशिक्षण केंद्राचा पालकमंत्री बड़ोलेच्या हस्ते शुभारंभ

0
9

अर्जुनी मोरगाव,दि.8,-डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), डी गेन ग्रुप व एबी एंड सी स्किल एंड एज्युकेशन यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी लॉजिस्टीक सेक्टर व जीएसटी अकाउंट क्षेत्रातील मोफत कौशल विकास प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ ८ डिसेंबर रोजी झिल इन्फो-टेक कम्प्युटर, अर्जुनी मोरगाव येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बड़ोले यांच्या हस्ते करण्यात आले.
जि.प.उपाध्यक्षा रचनाताई गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन प्रसंगी प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव पं.स. सभापती अरविंद शिवणकर,भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष नामदेव कापगते, ठाणेदार प्रशांत भस्मे, शिवप्रसाद पालीवाल, भाजपा जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, माजी सभापती प्रकाश गहाणे, न प उपाध्यक्ष विजय कापगते, रघुनाथ लांजेवार, डीगेन चे संचालक तुषार राठी, विनोद ठोम्बरे,एबी एंड सी के अक्षय बाहेती, बार्टी च्या सहायक प्रकल्प संचालक नेहा ठोम्बरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमा ची प्रस्तावना प्रशिक्षण केंद्राचे संचालक माणिक मेश्राम यांनी केले. संचालन श्री काकडे यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने युवक-युवती व परिसरातील नागरिक उपस्थित होते.