आज ओबीसी विद्यार्थी, युवक-युवती महाअधिवेशन नागपूरात

0
9

विविध विषयांवर होणार मान्यवरांचे मार्गदर्शन
गोंदिया,दि.20 : ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक, युवतींना एकत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरात २० डिसेंबरला ओबीसी विद्यार्थी,विद्यार्थिनी, युवक, युवती महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे़ भाऊसाहेब डॉ़ पंजाबराव देशमुख सभागृह कॉंग्रेस भवन येथे महाअधिवेशन होणार असून, ओबीसींच्या विविध समस्या, मागण्या आणि विषयांवर या महाअधिवेशनात विचारमंथन होणार आहे़

जलसंधारण मंत्री प्रा़ राम शिंदे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार असून, पूजा मानमोडे स्वागताध्यक्ष असणार आहेत़ माजी खासदार तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ़ खुशालचंद्र बोपचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील़ यावेळी राष्ट्रीय ओबीस महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा़ डॉ़ बबनराव तायवाडे, ज्येष्ठ विचारवंत गणेश हलकारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत़,ते नव्या जगाची ओळख या विषयावर ते मत मांडतील़ तर,विधानपरिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,माजी मंत्री एकनाथराव खडसे, नाना पटोले,आमदार विजय वडेट्टीवार, बळीराम सिरसकर,आमदार सुनील केदार, आमदार आशिष देशमुख,आमदार रवी राणा,आमदार डॉ़ परिणय फुके,माजी आमदार सेवक वाघाये,माजी आमदार डॉ़ अविनाश वारजुकर आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे़.
द्वितीय सत्रात समारोप होणार आहे़ समारोपाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर राहणार आहेत़ यावेळी गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे हे एकविसाव्या शतकातील ओबीसी विद्यार्थी व युवकांसमोरील आव्हाने, प्रा़ शेषराव येलेकर हे भारत सरकार शिष्यवृत्ती व महाराष्ट्र सरकारची प्रतिपूर्ती योजना, आणि मेघा सुरेश रामगुंडे या ओबीसी चळवळीत विद्यार्थी, विद्यार्थिनी व युवकांचा सहभाग या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत़ यावेळी आमदार डॉ़ संजय कुटे, आमदार सुधाकर कोहळे, चंद्रपूर जि़प़अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमोद मानमोडे, दिनेश दादापाटील चोखारे, , माधव कांबळे, ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित राहणार आहे़त.या एक दिवसीय महाअधिवेशनाला ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवतींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बबलू कटरे,अमर वराडे,खेमेंद्र कटरे,कैलास भेलावे,गौरव बिसने,पारस कटकवार,कमलेश बारेवार,सुनिल भोंगाडे,शिशिर कटरे,सुनिल पटले,चौकलाल येळे,मनोज डोये,लिलाधर गिर्हेपुंजे,हरिष ब्राम्हणकर,मनोज शरणागत,भरत शरणागत,कृष्णा ब्राम्हणकर,हरिष कोहळे,दिनेश हुकरे,लिलेश रहागंडाले,उध्दव मेहंदळे,जितेश राणे,प्रेम साठवणे,बंशीधर शहारे,रवि हलमारे,राजेंद्र पटले,अनिल कटरे,राजेंद्र चामट,सुधीर ब्राम्हणकर,रामलाल दसरिया,लक्ष्मण नागपूरे,सुरेंद्र डोये,चंद्रकुमार बहेकार,प्रेमलाल साठवणे,विवेक मेंढे,बाबा बहेकार,गणेश बरडे,माधव फुंडे आदींनी केले आहे.