आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माविम बचतगट महिलांची मोटरसायकल रॅली

0
17

शहरातील अनेक महिलांचा सहभाग
१० महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप
दोन केंद्रांना २४ लाखाच्या धनादेशाचे वाटप
गोंदिया,दि.२ : आदय शिक्षिका समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त आज ३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता नेहरु चौक येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे यावेळी बचतगटातील १० महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप करतील. महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया व स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव यांना प्रत्येकी २४ लाख रुपयाचा धनादेश देतील व रॅलीला हिरवी झेंडी दाखवतील. यावेळी नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मतांदा राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जि.प.माजी सभापती सविता पुराम, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक निरज जागरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी बचतगटातील महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून ही रॅली शहरातील मुख्य भागातून फिरुन नेहरु चौक येथे विसर्जीत होईल. या रॅलीमध्ये शहरातील युवती व महिलांनी मोटरसायकलसह सहभागी व्हावे, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले आहे.