शिष्टमंडळाने घेतली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट

0
21

गोंदिया,दि.31ः-महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री विनोद तावडे व शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार साहेब यांची भेट घेऊन २३ ऑक्टो.२०१७ ला वरिष्ठ वेतनश्रेणी न देण्याचा जो शासन निर्णय आहे. तो अन्यायकारक असल्यामुळे रद्द करण्यात यावा, कारण त्यात ज्या शिक्षकांना १२ वर्ष व २४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात येत होती. ती शालाशिद्धी न झाल्यास व ८०% शाळेचा हि एका शिक्षकाच्या कामगिरीवर अवलंबून नसून ती संपूर्ण शाळेतील शिक्षकाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. हा शासन निर्णय शिक्षकावर अन्यायकारक असून तो शासन निर्णय रद्द करावा किंवा त्यातील जाचक अटी रद्द करावे अशी मागणी शिष्ट मंडळाने केली. या मागणीविषयी शिक्षण मंत्री विनोद तावडे व शिक्षणसचिव नंदकुमार यांनी दुजोरा देऊन लवकरच याबाबद सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.
या शिष्टमंडळात गोंदिया जिल्ह्यातून संघटनेचे राज्याध्यक्ष विनेश खांडेकर ,गोविंद उगले, सुनील दुधे, आशुतोष चौधरी, प्राजक्ता झावरे, कुणाल पवार, संदीप पवार, गोविद करकिले, अमोल शेळके, भूषण उपस्थित होते.अशी माहिती संदीप सोमवंशी यांनी दिली आहे.