स्व. मनोहरभाई पटेल जयंती समारोहाची जय्यत तयारी

0
9
गोंदिया,दि.07 : स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्ताने आयोजित स्वर्णपदक वितरण समारोहाची जय्यत तयारी डी.बी. सांयन्स कॉलेजच्या प्रांगणात सुरू आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य मंडप उभारणी करून आयोजकांनी मान्यवरांच्या स्वागताची विशेष तयारी केली आहे.
या कार्यक्रमाचे उद््घाटन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश हे करतील. तर अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. नरेश अग्रवाल, प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन, गायक सोनू निगम, हास्य कलाकार राजू श्रीवास्तव, आ. अबू आझमी, माजी मंत्री अनिल देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात गुजराती नॅशनल हायस्कूल गोंदियाची सिया धमेंद्र ठाकूर, ओंकार केशव चोपकर, रिचा अनिल बिसेन, वैष्णवी अशोक शेंडे, दिशा संतोष अग्रवाल, दीपा गणेश पंजवानी, तोशाली भोयर, नूपुर चंद्रकांंत खंडेलवाल, पूनम प्रमोद रोहणकर, ओजल धमेंद्र उरकुडकर, मोनिका नरेंद्र नखाते, हर्षा गोपाल बलवानी, नूतन मनगटे, अश्विनी दीनदयाल रोकडे यांचा समावेश आहे. या विद्यार्थी-विद्यार्थिनींशिवाय कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींचाही सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान अ‍ॅकेडमीचे सचिव आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाची तयारी सुरू असून डी.बी. सांयन्स कॉलेजचे सर्व कर्मचारी व अ‍ॅकेडमीचे पदाधिकारी, सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करीत आहेत. यावेळी एनएमडी महाविद्यालयाच्या प्रांगणात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात झालेल्या विकासाची माहिती देणारी प्रदर्शनी आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.