विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर अध्यक्षपदी अनिकेत आंबेकर तर  सचिवपदी चैतन्य हिरपूरकर यांची निवड

0
17

अमरावती,दि.09- विद्यार्थी परिषदेची आज झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदी श्री अनिकेत आंबेकर तर सचिवपदी श्री चैतन्य हिरपूरकर निवडून आलेत. विद्यार्थी परिषदेची प्रथम सभा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे अध्यक्षतेखाली विद्यार्थी भवनात पार पडली. यावेळी विद्यार्थी परिषदेचे सर्व सदस्य, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, निर्वाचन अधिकारी तथा कुलसचिव डॉ. अजय देशमुख उपस्थित होते.
अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी अनिकेत आंबेकर यांना 8 मते तर कु. शुभांगी सोळंके यांना 6 मते मिळालीत.  अनिकेत आंबेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. एक मत अवैध ठरले. सचिव पदासाठी सुध्दा दोन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अभिजीत देशमुख यांना 7 मते तर चैतन्य हिरपूरकर यांना 8 मते मिळालीत.  चैतन्य हिरपूरकर यांना विजयी घोषित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी परिषदेचे समीक्षा पराचंद हस्ते, एस.पी.एम. सायन्स आणि गिलाणी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी, जि. यवतमाळ, आकाश गजानन सुर्यवंशीे, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब, ता. दारव्हा, जि. यवतमाळ, शाम ब्राम्हा जाधव, श्रीमतीे सविताबाई उत्तमराव देशमुख, महाविद्यालय, दिग्रस, जि. यवतमाळ, शशिकांत औदुंबर पाटील, श्री शिवाजी सायन्स कॉलेज, अमरावती, निकिता राजू मारोठे, स्व. कु. दुर्गा कन्हैयालाल बनमेरु सायन्स कॉलेज, लोणार, जि. बुलढाणा, शुभांगी सुदर्शन सोळंके, बॅ. रामराव देशमुखे कला, श्रीमती इंदिराजी कापडीया वाणिज्य व न्यायमूर्ती कृष्णराव देशमुख विज्ञान महाविद्यालय, बडनेरा रेल्वे, जि. अमरावती, अनिकेत अनिल आंबेकर, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती, प्रतीक्षा सुभाष लकडे, महात्मा ज्योतीबा फुले, वाणिज्य, विज्ञान व विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय, भातकुली, जि. अमरावती, चैतन्य शशिकांत हिरपूरकर, नथमल गोयनका लॉ कॉलेज. अकोला, चैतन्य श्याम फाटे, शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय, अकोला, अभिजित पुरुषोत्तम देशमुख, श्री शिवाजी कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय, मोताळा, जि. बुलढाणा, प्रज्ञा शेषराव इंगळे, विज्ञान महाविद्यालय, मलकापूर, जि. बुलढाणा, दीपाली रामदास कोचे, जिजाऊ शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ, दीपाली दिलीप गेडाम, श्रीमतीे वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसद, जि. यवतमाळ, साक्षी भूषण महाजन, स्व. पुंडलीकराव गवळी कला आणि विज्ञान महाविद्यालय, शिरपूर (जैन)े ता. मालेगांव जि. वाशिम हे सदस्य उपस्थित होते.

निवडणूकीसाठी गठीत समितीमधे डॉ. प्यारेलाल सुर्यवंशी, डॉ. रविंद्र सरोदे, डॉ. अनिता रामटेके, डॉ. जयश्री वैष्णव, डॉ. एम.एम. राठोड, डॉ. राजेश मिरगे, डॉ. अविनाश असनारे तसेच छाननी व मत मोजणी समितीमध्ये अध्यक्ष डॉ. आनंद अस्वार तर सदस्य म्हणून डॉ. नितीन कोळी, मंगेश वरखेडे, डॉ. ए.एल. राठोड यांनी काम पाहीले. यावेळी डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. विलास नांदुरकर, श्री राजेश पिदडी, श्री संजय खोब्राागडे, सुनिल बनसोड, संतोष वानखडे आदींनी निवडणूक कार्यात सहकार्य केले. नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी पुस्तक देवून अभिनंदन केले.