भाजपच्या नाराज गटाची गोंदियातही बैठक

0
11

गोंदिया-भारतीय जनता पक्षामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजी असून भाजपचे जुने नेते व पदाधिकारी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करू लागले आहेत.त्यातच संघटनमंत्र्याच्या अतिरेकी त्रासाला कंटाळलेल्या पक्षातील नाराज नेत्यांनी बैठका घेऊन आपला रोष पक्षाच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून देण्यास सुरवात केली आहे.एकीकडे दिल्लीतील सत्ता भाजपच्या हातातून गेलेली असताना पक्षातील अंतर्गत बंडाळी थांबविण्यासाठी व हुकूमशाहीवर टाच आणण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री सध्यातरी अपयशी ठरले आहेत.आमगाव येथील काही पक्षाच्या जुन्या नेत्यांना डावलल्याच्या विरोधात पार पडलेल्या बैठकीनंतर मंगळवारी गोंदिया तालुक्यातील भाजपच्या नाराज नेत्यांची सुध्दा गुप्तठिकाणी बैठक पार पडली.या बैठकीत तालुक्यातील नेत्यांनी संघटनमंत्री व जिल्हाध्यक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत स्वाभिमानाने पक्षात स्थान मिळत नसेल तर वेळप्रसंगी पक्ष सोडण्याचा सुध्दा विचार करावा लागेल असा विचार या बैठकीत व्यक्त करण्यात आले. सुमारे ५०-१०० च्यावर गोंदिया तालुक्यातील भाजपचे नाराज पदाधिकारी,कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.