गोंदिया नगरपरिषदेतील रोजदारंी कर्मचार्यांना स्थायी करण्याचा मार्ग मोकळा

0
12
गोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.१०- नगरपरिषदेत १९९३ पुर्वीपासून कार्यरत असलेल्या अस्थायी रोजदांरी कर्मचारी वर्गाला गेल्या अनेक वर्षापासून स्थायी करण्यासाठी स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यामार्फेत प्रयत्न सुरु होते.त्यातच गेल्यावर्षी पुर्ण बहुमताने आलेल्या नगरपरिषदेतील भाजपचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनीही सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून ६० कर्मचाèयांना स्थायी होण्याचा मार्ग ८ फेबुवारीच्या नगरविकास मंत्रालयाच्या शासन निर्णयानुसार मोकळा झाला.शासन निर्णयानुसार रोजदांरी कर्मचाèयांपैकी शिक्षिका व बालवाडी शिक्षिका वगळून प्रथम टप्यात वर्ग ३ च्या ३७ रोजदांरी कर्मचाèयांचे व वर्ग ४ च्या २३ कर्मचाèयांचे गोंदिया व तिरोडा नगरपरिषदेत तसेच पवनी,तुमसर व भंडारा येथील स्थायी रिक्त पदावर सेवाजेष्ठतेनुसार समावेश करण्यास मंजुरी दिली आहे.त्यामध्ये तिरोडा नगपरिषदेतील २० स्थायी पदावर वर्ग ३ च्या २०,पवनी येथे २,तुमसर येथे १० व भंडारा नगरपरिषदेत ५ कर्मचाèयांचे समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.गोंदिया नगरपरिषदेतील पदोन्नतीप्रकिया पूर्ण करुन वर्ग ४ च्या १७ पदावर तसेच भंडारा,पवनी,तुमसर नगरपरिषदेत प्रत्येकी २ याप्रमाणे ६ अशी २३ पदे समावेश करण्यात आली आहेत.विशेष म्हणजे ही समावेशन प्रकिया ३१ मार्चपुर्वी करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश सहसचिव स.श.गोखले यांनी दिले आहेत.