दुष्काळी परिस्थितीत वीज जोडणी कापू नका – आ. पुराम

0
9

आमगाव,दि.02ः-तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने नागरिक व शेतकर्‍यांना पाण्याची कमतरता होऊ नये. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मदतीची उपाययोजना करून मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश आ. संजय पुराम यांनी पाणीटंचाईवर उपाययोजना आढावा सभा व सरपंच मेळाव्यात दिले.
आमगाव तालुक्यात पावसाळ््यातील कमी पावसामुळे सदृश्य दुष्काळाची परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे पीक नुकसान झाले तर उन्हाळय़ातील पिण्याचे पाण्याची समस्यांनी शेतकरी व नागरिकांना पायपीट केली. या समस्यांच्या निराकरण शासनस्तरावर तातडीने व्हावे, यासाठी आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत स्थानिक नगर परिषद सभागृहात पाणी टंचाईवर उपाययोजना आढावा व सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयोजित आढावा सभेत तहसीलदार रावसाहेब राठोड, पं.स. सभापती वंदना बोरकर, उपसभापती जयप्रकाश शिवणकर, पं.स. सदस्य ओमप्रकाश मटाले, अशोक पटले, लोकेश अग्रवाल, जि.प. सदस्य शोभेलाल कटरे, जियालाल पंधरे, सुरेश हर्षे, सुखराम फुंडे, पं.स. सदस्य छबू उके, नरेंद्र बाजपेयी, अधिकारी व सरपंच उपस्थित होते.
आमदार पुराम पुढे म्हणाले, विंधन विहिर स्वच्छता व खोलीकरण, कोरड्या विहिरींमधील गाळ स्वच्छता व खोलीकरणाचे काम उपाययोजना करण्यात यावी, तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे शेतकर्‍यांचे वीज जोडणी कापण्यात येऊ नये, यासाठी शासन निदेर्शाचे पालन व्हावे, असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी शासन योजनांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित सरपंच, पं.स. सदस्य, जि.प. सदस्य यांनी पाणी टंचाईवर समस्या पुढे ठेवल्या. तर प्रशासनातील अधिकारी यांनी त्या नमूद करून तात्काळ उपाययोजनेसाठी आढावा शासनास सादर करण्याचे मत व्यक्त केले.