साकरीटोला येथे आज कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

0
18

सालेकसा, दि.१५ : युवा कुणबी समाज सेवा समिती साकरीटोला ता. सालेकसाच्या वतीने आज रविवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी ११.00 वा जि.प. हायस्कूलच्या पटांगनावर कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे.
या विवाह सोहळय़ात १४ जोडप्यांचा शुभमंगल होणार आहे. या वेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी अर्थ व नियोजन मंत्री महादेवराव शिवणकर, मा. मंत्री भरतभाऊ बहेकार, माजी खा. नानाभाऊ पटोले, आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, आ. परिणय फुके, माजी आ. राजेंद्र जैन, रामरतनबापु राऊत, केशोराव मानकर, भेरसिंहभाऊ नागपूरे, नरेश महेश्‍विरी, महिला व बालकल्याण सभापती लताताई दोनोडे, मा.जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी सभापती देवराव वडगाये, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, गोंदियाचे नगराध्यक्ष आशोक इंगले, देवरीच्या पं. स. सभापती सौ. सुनंदा बहेकार, जि. प. सदस्य जियालाल पंधरे, टोलसिंह पवार, सालेकसाच्या पं. स. सभापती अर्चना राऊत, उपसभापती दिलीप वाघमारे, सहेशरामजी कोरोटे, सरपंच संगिताताई कुसराम, संपत सोनी, नटवारलाल गांधी, विजय बहेकार, प्रमोद येटरे, आदी प्रामुख्याने उपस्थित राहुण उपवर-वधूना आशीर्वाद समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.