शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

0
18

तिरोडा,दि.02ः- लघु पाटबंधारे विभागाच्यातंर्गत जलयुक्त शिवार अभियान योजनेतंर्गत बंधाऱ्याचे बांधकाम करताना जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची परवानगी न घेताच बांधकाम सुरु केल्याचाचा प्रकार तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस आला आहे.येथील बंधारा बांधकाम वापरल्या जात असलेल्या साहित्याबाबत उपसरपंच राकेश वैद्य यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केली. मात्र यानंतरही साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे हेतूपुरस्पर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे
परसवाडा येथे छगन मरस्कोल्हे यांच्या शेताजवळ नाला असून या नाल्यावर गोंदिया लघू पाटबंधारे विभागातर्फे बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकाम मरस्कोल्हे यांची तीन आर जागा गेली. मात्र याची माहिती मरस्कोल्हे यांना नव्हती. त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांना याचा धक्का बसला व २६ मे रोजी या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या बंधारा बांधकामात वापरल्या जाणाºया साहित्यावर सुध्दा शंका निर्माण झाली आहे. बंधाºयाचे बांधकाम करताना माती खोदून झाल्यानंतर ८ एमएम दगडांची पीचिंग केली जाते. नंतर ४० एमएम गिट्टीची १ फूट लेयर देऊन लोखंडी जाळी १० एमएम लोखंड बांधून २० एमएम गिट्टीचे सिमेंट क्रांकीट टाकून लेयर टाकले जाते.
भिंत तयार करताना जाळी तयार करुन रिंगाची जाळी तयार १० एमएम लोखंडाने करणे बंधनकारक असल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदार अंदाज पत्रकातील निकषांप्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप आहे. बांधकामात वापरले जाणारे दगड, लोखंड तसेच इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर साहित्याची गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.खैरलांजी, परसवाडा, अर्जुनी या गावातील कामे जि.प.लघुसिंचन उपविभाग तिरोडा अंतर्गत सुरू आहे. यासर्व कामांची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच राकेश वैद्य, मोहन तितिरमारे, प्रतिभा टेंभुर्णीकर, उषा बोपचे यांनी केली आहे.