पोलीस अधिक्षक विनिता साहूविरोधात राष्ट्रवादीची तक्रार

0
7

भंडारा,दि.02ः-भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्याशी गैरवर्तणूक केल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी तक्र ार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस धनंजय दलाल यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली आहे.
३१ मे रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सामाजिक न्याय भवनात घेण्यात आली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे बर्‍याच मतांनी आघाडीवर होते. मतमोजणीची प्रक्रि या जवळपास संपण्याच्या मार्गावर होती. त्यावेळी मधुकर कुकडे हे त्यांचे प्रतिनिधी धनंजय दलाल व इतरांसोबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे विजयाचे प्रमाणपत्र किती वाजता देणार याबाबत चौकशी करण्यासाठी मतमोजणी केंद्रात गेले होते. परंतु, प्रमाणपत्र मिळण्यास बराच वेळ असल्यामुळे मधुकर कुकडे, धनंजय दलाल व अन्य मतमोजणी केंद्रातून बाहेर पडत असताना पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी मधुकर कुकडे यांच्याशी असभ्य वर्तणूक केली. ‘तुम्ही आत कसे आलात, तुम्हाला आतमध्ये जाण्याचे अधिकार नाही, अशी भाषा वापरली. एवढेच नव्हे, तर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेले उमेदवार ओळखपत्रही हिसकावून घेतल्याचा आरोप धनंजय दलाल यांनी तक्र ारीतून केला आहे.या प्रकाराची चौकशी करून पोलिस अधीक्षकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धनंजय दलाल यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केली आहे.