शेतकèयांना वेळेवर कर्ज मिळायलाच हवे-आ.रहागंडाले

0
8

तिरोडा ,दि.१२: सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकèयांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकèयांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकèयांना वेळेवरच पिककर्ज मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
येथे आयोजीत तालुकास्तरीय पीक कर्ज वाटप मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, जि.प.सदस्य सुनिता मडावी, विणा बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, सदस्य पटले, सरपंच तुमेश्वरी बघेले, पं.स.सभापती निता रहांगडाले, सदस्य रमणिक सोयाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांनी, आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ५५ कोटी रुपयांचे कर्ज शेतकक्तयांना वाटण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० हजार ७१९ शेतकक्तयांना ३५ कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे. धानाचे बोनस शेतकèयांना देण्यात आले असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी चालू असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक तहसीलदार संजय रामटेके यांनी केले. संचालन डॉ. प्रकाश गंगापारी यांनी केले. आभार कृषी सेवक खंडाईत यांनी मानले. कार्यक्रमासाठी महसूल विभाग, कृषी विभाग व बँक कर्मचाक्तयांनी सहकार्य केले