एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारीपदी राचेलवार रूजू

0
11

देवरी ,दि.२३ :येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीपदी व्ही. एस. राचेलवार हे गुरुवारी २१ जून रोजी रूजू झाले. यावेळी प्रकल्पाअंतर्गत शासकीय आर्शमशाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राचेलवार हे पूर्वी गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयात सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. २१ जून रोजी त्यांनी देवरी प्रकल्पाचा कार्यभार हाती घेतल्यावर प्रकल्पातंर्गत येणाड्ढया शासकीय आर्शमशाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी प्रामुख्याने बोरगाव/बाजारचे मुख्याध्यापक एम. एल. भकरे, कडीकसाचे ए. आर. राऊत, ककोडीचे एम. आर. शहारे, पालांदूर जमी.चे डी. के. कठाणे, पुराडाचे एस. व्ही. लांजेवार, शेंडाचे शंभरकर, इळदाचे ई. एम. दुबे, बिजेपारचे टी. एस. चोपकर, जमाकुडोचे पी. जी. कळंबे, मजीतपूरचे डी. जी. कोल्हारे, कोयलारीचे वाय. बी. आष्ठणकर प्रामुख्याने उपस्थित होते.