‘अमित शहांविरुद्ध गुन्हा दाखल करा’

0
9

भंडारा,दि.05 : काळा पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपा पुढारी सांगत असले तरी ख-या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नोटबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात काळा पैसे पांढरा केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एनएसयुआय व काँग्रेसच्यावतीने गुरूवारी शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन करण्यात आली.पोलीस निरिक्षकांना निवेदन देतेवेळी जि.प.सदस्य प्यारेलाल वाघमारे व प्रदेश सचिव शुभम गभने, जिल्हाध्यक्ष पवन वंजारी,जिल्हा महासचिव शुभम साठवणे, जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश भोंदे,सुरेश तितिरमारे,शुभम वैद्य,मयूर साठवणे,विवेक गायधने,महेश धावळे,महादेव बिसने,संकेत वर्मा,राजेश सिंदपुरे,अक्षय पारधी, इत्यादी एन.एस.यु.आय. सदस्य उपस्तिथ होते .नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका व त्रास सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागला. परंतु, याच कालावधीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले अमित शाह यांनी आपल्या बँकेत जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करून घेतल्या. हा प्रकार कष्टकरी व सर्वसामान्यांच्या जखमांवर मिठ चोळणाराच आहे. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.