सावंगीतील विश्रामगृह बांधकाम कार्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपुजन

0
12

गोंदिया, दि.१० – सडक अर्जुनी तालुक्यातील सावंगी येथील विश्रामगृहाच्या प्रांगणातील बैठक कक्ष व अतिमहत्वाच्या व्यक्तीकरीता कक्षाच्या बांधकाम कार्याचे भूमीपुजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी सडक अर्जुनीचे पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून चिखलीचे जिल्हा परिषद सदस्या माधुरी पातोडे, सडक अर्जुनी पंचायत समिती उपसभापती राजेश कठाणे, कविता रंगारी, सावंगी ग्रामपंचयतचे सरपंच गुलशेर खॉ पठाण उपस्थित होते.
या ठिकाणी बैठक कक्ष व अतिमहत्वाच्या व्यक्तीकरीता कक्षाच्या बांधकाम कार्य २२०.३९६ चौ. मीटर क्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच अंतर्गत व बाह्य पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रेन वॉटर हार्वेस्टींग, संरक्षण भिंतीचे बांधकाम, सायकल व स्कुटर स्टँडचे बांधकाम, सिमेंट कॉंक्रीट रस्ते व नालीचे बांधकाम, मोरीचे बांधकाम, बोरवेल आदींचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच फर्निचर लावण्यात येणार आहे.