पी. सी. बोपचे यांचे निधन 

0
8

भंडारा,दि.19 :सुयोग नगरातील सेवानवृत्त उपशिक्षणाधिकारी पी. सी. बोपचे (८६) यांचे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी स्थानिक वैनगंगा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे व बराच आप्तपरिवार आहे. सेवानवृत्त उपशिक्षणाधिकारी माया देशमुख व लालबहादूर शस्त्री विद्यालयाच्या नवृत्त शिक्षीका छाया देशकर यांचे ते वडिल होत.महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील पोवार समाजाला संघटीत करण्यासाठी त्यानी कार्य केले आहे.