स्वयंपाकीन महिलांच्या आंदोलनाला प्रतिसाद

0
6

गोंदिया,दि.२३ : आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकीन महिला संघटनेने जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढून धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे.या धरणे आंदोलनाच्या दुसèयादिवशी आम आदमी पार्टीचे पुरुषोत्तम मोदी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाqठबा जाहिर करीत मार्गदर्शन केले.
या आंदोलनात २ हजारावर महिलांचा सहभाग असून २२ ऑक्टोबरपासून ते ३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शालेय पोषण आहार शिजविण्यासह शाळेतील इतर कामे करणाèया स्वयंपाकी महिलांना फक्त १ हजार रूपये मानधनावर काम करावे लागते. तेही मानधन ५-५ महिने मिळत नाही. त्यामुळे विद्याथ्र्यांचे जेवण तयार करणाèया स्वयंपाकीन महिला उपाशी राहण्याची पाळी आली आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांना घेऊन त्यांनी जिल्हा परिषदवर मोर्चा काढून धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे.
स्वयंपाकीन महिलांना १० महिन्याऐवजी १२ महिन्याचे वेतन द्यावे, दरारोज २०० रूपये प्रमाणे मानधन द्यावे, किमान वेतन कायद्यांतर्गत किमान वेतन लागू करण्यात यावे, स्वयंपाकी महिलांना कायम करण्यात यावे, नव्याने स्वयंपाकीन महिलांची नियुक्ती शासनाने करावी, एखाद्या ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास त्या ठिकाणच्या स्वयंपाकी महिलेला दुसèया शाळेत हलविण्यात यावे, या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष चंदा दमाहे, कार्याध्यक्ष मनोज दमाहे, शिवनाथ खरोले, प्रमिला राऊत, प्रतिभा बडगे, सुनिता पाऊलझगडे, देवका नरेश बहेकार, गीता सोनवाने, भोजराम वाढई, सरीता उके यांनी केले.