माजी आमदार स्व.रामचंद्र हरिणखेडे समाजसुधार व्यक्तिमत्व-आ.अग्रवाल

0
21

माजी आमदार स्व.रामचंद्र हरिणखेडेच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचा सत्कार

गोंदिया,दि.१३-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सहकार महर्षी स्व.रामचंद्रजी हरिणखेडे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त रविवार(दि.११)ला गोंदिया तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कृषक सोसायटीचे माजी अध्यक्ष भिकाभाऊ चव्हाण होते.तर उदघाटन गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उदघाटक म्हणून बोलतांना आमदार अग्रवाल यांनी स्व.रामचंद्र हरिणखेडे हे समाजसुधारक विचाराचे व्यक्तिमत्व राहिलेले व्यक्ती असून त्यांनी राजकारणासाठी व सत्तेसाठी कधीही कुणाशीही तडजोड़ न करता संघर्ष व सत्याच्या मार्गानेच कार्य केलेले आहे.राजकारणासोबतच त्यांनी पुर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सहकाराची चळवळ बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न विसरता येणारे नसून विदर्भ को.ऑफ.संस्थेचे संचालक म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व विनोबा भावे यांच्या विचारांचा आदर्श बाळगत त्यांनी ईमानदारीचे राजकारण आपल्या कार्यकाळात केले असून त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे पुत्र डॉ.कैलाशचंद्र हरिणखेडे आजही राबवित आहेत हीच खरी त्यांच्या कार्याची पावती असल्याचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.खुशालचंद्र बोपचे,माजी आमदार हेमंत पटले,जनता बँकेचे अध्यक्ष डॉ.राध्येशाम अग्रवाल,हभप लोकेशचंद्र बांगरे महाराज,धन्नालाल शहारे,प्रगतीशिल शेतकरी श्रीराम ठाकूर,जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे,जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,प्रगतीशिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण,डॉ.झामसिंह बघेले,पी.जी.कटरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बालकृष्ण पटले,गोंदिया बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे,डॉ.नरेंद्र हरिणखेडे,पृथ्वीराज रहागंडाले ,आयोजक डॉ.कैलाशचंद्र हरिणखेडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी आमदार हेमंत पटले,डॉ.राध्येशाम अग्रवाल,धनलाल सहारे,धनलाल ठाकरे,बालकृष्ण पटले,श्रीराम ठाकूर यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्रा.संजिव रहागंडाले यांनी केले तर आभार युवराज पारधी यांनी मानले.कार्यक्रमाला नातेवाईकांसह आप्तेष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.