डांगोर्लीघाटात अवैध रेती उत्खन्नन,साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त

0
9
संग्रहित छायाचित्र वैनगंगा नदीघाटावरील

डांगोर्लीतील वैनगंगा नदीपात्रात महसुल व पोलीसांची सयुंक्त कारवाई
गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.२२ः-जिल्ह्यातील रेतीघाटाचे अद्यापही लिलाव झालेले नसतांनाच गोंदिया तालुक्यातून जाणाèया वैनगंगा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खन्नन करुन त्याची वाहतुक होत असल्याच्या माहितीनुसार महसुल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धाड घालून डांगोर्लेी येथील नदीघाटावरुन सुमारे साडे सात लाखाच्या वरील मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच अवैधसाठा करणाèया लखन बहेलियासह ट्रक्टरचालक मालकाविरुध्द रावणवाडी पोलीसात मंडळ अधिकारी यांनी आज लेखी तक्रार नोंदविली आहे.जिल्ह्यात अवैध उत्खनन व वाहतुकीच्या कारवाईसाठी सयुंक्तपणे केलेली ही पहिलीच कारवाई आहे.अवैध रेती वाहतुक करणारे हे जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाशी जवळीक साधणारे असल्याची चर्चा आहे.त्यातच रात्रीला रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध उत्खन्नाचे वाहन ये जा करीत असताना पोलीस विभागाला कसे कळले नाही हा सुध्दा प्रश्न उपस्थित होत रावणवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, तहसिलदार राहुल सारंग,रावणवाडीचे पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर,मंडळ अधिकारी प्रकाश तिवारी,तलाठी,देवेंद्र भगत,धन्नुलाल मडावी,बिहारीलाल बिसेन,अमित बडोले,अव्वल कारकून आशिष रामटेके,पोलीस शिपाई उमाळे,नंदेश्वर यांच्या पथकाने हि कारवाई केली. गोंदिया तालुक्यात २२ नोव्हबेंरच्या रात्रीला अवैध रेती उत्खन्न वाहतुकीच्या अनुषंगाने सयुंक्त पेट्रोqलगवर असताना रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीपात्रात रात्री २ वाजेच्या सुमारास काही इसम रेतीचे उत्खनन करुन ट्रक्टरद्वारे वाहतुक करीत असल्याचे लक्षात आले.त्यामुळे गस्तीवर असलेले पथकातील सर्व अधिकारी कर्मचारी हे त्याठिकाणी कायदेशीर कारवाईकरीता गेले असताना ४ ट्रक्टरपैकी एका ट्रक्टरचालक घटनास्थळावून भरलेल्या रेतीसह पसार झाला.तर ३ ट्रक्टरचालक हे ट्रालीसह घटनास्थळवरच असल्याने चालक व मालकाचे बयाण नोंदविण्यात आले.घटनास्थळावरून दोन मोटारसायकल सुध्दा हस्तगत करण्यात आल्या.त्यामध्ये एमएच ३५,झेड ८६६४ होडां कंपनीची ड्रीम निओ दुचाकी असून २० हजार रुपये किमत आहे.तर एम एच ३५ यु.२५४९ बजाज कंपनीची डिस्कवर २० हजार किमतीची समावेश आहे.त्याचप्रमाणे ट्रक्टरने पळून गेलेल्या चालकाच्या खिशातून पडलेल्या दुचाकीचे नोंदणीबुक व ५ हजार किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईलचा समावेश आहे.घटनास्थळावरील शिवशंकर रमेश लिल्हारे नामक व्यक्तीकडे हिरव्या रंगाची नोंदवही मिळून आली.सदर नोंदवहीतत रेतीसाठ्याच्या नोंदी आढळून आल्या असून पहिल्या पानावर ट्रक्टरनिहाय रेतीच्या वाहतुकीची माहिती आढळून आली.त्यात लखन बहेलिया(बीबी ट्रेडर्स गाडी क्रमांक ७२९९)चे ८०० रुपयाचे बिल आढळून आले.त्याचप्रमाणे नदीपात्राच्या लगत असलेल्या सोनुदेवपहाडीजवळील शासकीय जागेत अंदाजे ३० ब्रास रेतीचा अवैधरित्या केलेला साठा आढळून आला.यामोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक्टरमध्ये एमएच ३५,जी.५६३१ व ट्राली एफ १५१०,एमएच ३५ एजी २९८२,ट्राली एफ १८९६,एमएच ३५ जी.५२२२ ट्राली एफ.३५८८ हे जप्त करण्यात आले असून यांची रेतीसह ७ लाख ५६ हजार एवढी किमंत आहे.तसेच नोंदवहीतील नोंदप्रमाणे अवैधरित्या रेतीचा साठा केल्याप्रकरणी लखन बहेलिया यांच्यासह ट्रक्टर चालक व मालकाविरुध्द रावणवाडी पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी प्रकाश तिवारी यांनी लेखी तक्रार नोंदविली आहे.