रामटेक विकास आराखड्यासाठी निधी कमी पडणार नाही – सुधीर मुनगंटीवार

0
12

नागपूर, दि. 23 : रामटेक हे विदर्भातील महत्त्वाचे तीर्थस्थळ असून या तीर्थस्थळाच्या विकासाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून आराखड्याची अंमलबजावणी करताना निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज रामटेक येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजनाप्रसंगी दिली.कार्यक्रमास खासदार कृपाल तुमाने, आमदार मल्लिकार्जून रेड्डी, महाराष्ट्र खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, डॉ. राजू पोतदार, नगर पालिकेचे उपाध्यक्ष प्रभाकर खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, उपविभागीय महसूल अधिकारी जोगेंदर कट्‌यारे, तहसीलदार धर्मेश फुसाटे आदि उपस्थित होते.

रामटेक तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने 150 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूरी दिली असल्याचे सांगतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पहिल्या टप्प्यात 49 कोटी 28 लक्ष रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 30 कोटी 35 लक्ष रुपयाच्या कामांचा शुभारंभ झाला आहे. रामटेक हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. रामटेक येथे आयोजित करण्यात येत असलेल्या यात्रा महोत्सवासाठी दरवर्षी पर्यटन विभागाच्या माध्यमातून 50 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल.श्रीरामाच्या दर्शनासाठी मध्य भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. रामनवमीच्या दिवशी येथे यात्रा भरत असून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी यात्रा आयोजित करण्यात येत असून गेल्या 38 वर्षापासून या शोभायात्रेचे आयोजन केल्या जात असल्याचा उल्लेख करतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रभु रामचंद्र हे आपले आदर्श असून या परिसराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी रामटेक परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून रामटेक विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित केलेली सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करताना हा आराखडा निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यात.आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी रामटेक परिसरात विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यात येत आहे. रामटेक विकास आराखड्याला मंजूरी दिल्याबद्दल तसेच निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. हा आराखडा मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रामटेकला भेट देणाऱ्या भक्तांसाठी 3 कोटी 12 लाख रुपये खर्च करुन भाविकांसाठी यात्री निवासाचे बांधकाम तसेच पर्यटन विकास अंतर्गत विविध मुलभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ झाला.खासदार कृपाल तुमाने यांनी विदर्भातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या रामटेक गड मंदिरसह परिसराच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रस्ताविक केलेली कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी राज्यशासनाने आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना केली.प्रारंभी कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांनी रामटेक विकास आराखड्यासंदर्भात माहिती दिली.यावेळी रामटेक नगरपालिकेचे सदस्य, लोकप्रतिनिधी, उपअभियंता ललीत होळकर, अगस्ती आश्रमाचे महंत संत गोपालबाबा, श्रीराम मंदिराचे मुख्य पूजारी मुकुंदराव पांडे, कैलास पुरी महाराज आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.