धापेवाडा उपसा सिंचन-१ चे पाणी रब्बी पिकांला मिळणार-आ. रहांगडाले

0
22

तिरोडा,दि.०९: धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.१ चे पाणी रब्बी पिकांकरिता लाभ क्षेत्रांतर्गत येणाèया शेतकèयांना त्वरीत देण्याच्या विषयाला घेऊन आमदार विजय रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये रब्बी हंगाम २०१८ करीता शेतकèयांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचा लाभ धापेवाडा उपसा सिंचन अंतर्गत लाभ क्षेत्रातील १५०० हेक्टर जमीनीला qसचनाचा फायदा होणार असून शेतकèयाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकèयांना रब्बी करिता पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावा व प्रत्येक शेतकèयांला पाणी मिळावे याकरिता आमदार रहांगडाले यांनी ४.५० कोटी रुपयांचा विशेष निधी सदर विभागाला उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकèयाला यावर्षी धापेवाडा उपसा qसचनाचे पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आढावा सभेला प्रामुख्याने जि.प. सदस्य मनोज डोंगरे, माजी जि.प. सदस्य डॉ. सुशील रहांगडाले, पं.स.सदस्य डॉ.वी.एस. रहांगडाले, पवन पटले, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, उपअभियंता पंकज गेडाम, सरपंच स्वप्नील बन्सोड, किरण पारधी, मकरम लिल्हारे व लाभक्षेत्राअंतर्गत येणाèया गावातील शेतकरी उपस्थित होते.