गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये बिबट, अस्वलाचा मृत्यू

0
17
filephoto

नागपूर,दि.16 : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस आले. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर गोरेवाडा परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये 3 सप्टेंर 2016 रोजी पाच बिबटे आणले होते. जुन्नर येथून या बिबट्याला आणले होते. तेव्हापासून बिबट्याचा मुक्काम येथेच होता. शुक्रवारी सकाळपर्यंत त्याची तब्येत चांगली होती. त्याने सकाळी मटणही खाल्ले. मात्र, सायंकाळी काहीच खाल्ले नसल्याचे सकाळी रेस्क्‍यू सेंटरचा कर्मचारी साफसफाईसाठी गेला असता लक्षात आले. पिंजऱ्याजवळ जाताच बिबट निपचित अवस्थेत आढळला. कर्मचाऱ्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पाचारण केले. डॉक्‍टरांच्या चमूने तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले. मात्र, कशामुळे मरण पावला हे कळत नव्हते. सर्पदंशाने तो मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू फुप्फुसाजवळ झालेल्या एका जखमेमुळे झाल्याचे उघड झाले. बिबट्याचे शवविच्छेदन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सहायक प्राध्याकपक डॉ. पी. एम. कोनकुसळे यांनी केले.