भाजप सरकारमुळेच भूमिधारीं शेतकरी झाला भूमिस्वामी : विनोद अग्रवाल

0
14

पिंडकेपार येथे ५ लाख रुपयांच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.27ः- गेल्या अनेक वर्षांपासून देशावर काँग्रेसने राज्य केले. गरिबी हटावचा नारा दिला मात्र काँग्रेस ने सत्ताकारणासाठी गरिबांचा फक्त वापरच करून घेतला. जनतेचे अतोनात हाल काँग्रेस सरकारने केले. आणि आता ४ वर्षात मोदी सरकारने काय केले हा प्रश्न विचारत आहेत. मात्र स्वतःचा ६० वर्षांचा हिशोब मागितला तर मूग गिळून गप्प बसतात,अशी टिका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केली. काँग्रेसच्या काळात वर्ग २ ची जमीन वर्ग एक मध्ये आणण्यासाठी शेतकऱयांना खूप त्रास सोसावा लागत होता. तसेच सरकारी कार्यालयाच्या चकरा मारून शेतकरी कंटाळला होता.मात्र आमच्या पक्षाची सरकार येताच वर्ग २ ची जमीन वर्ग १ मधे आणायला शेतकर्यांना फक्त साधा अर्ज करुन लाभ मिळाला. ज्याने भूमिधारीं शेतकरी भूमिस्वामी झाला असे म्हणाले.

ते पिंडकेपार येथील २५ / १५ योजने अंतर्गत आमदार परिणय फुके यांच्या प्रयत्नाने ५ लाख रुपयांच्या रस्ता भूमिपूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून शैलजा सोनवाने ( सभापती कृषी व पशु संवर्धन),दिप्ती चंद्रिकापुरे ( पं . स. सदस्या ) , सुधीरजी चंद्रिकापुरे ( सरपंच पिंडकेपार ), राजेशजी कोल्हे ( उपसरपंच पिंडकेपार ), रत्नमालाताई खोब्रागडे ( तं. मु. अध्यक्षा), अशोक हरिणखेडे (महामंत्री किसान आघाडी ), कमलेश सोनवाने (उपाध्यक्ष भाजपा), प्रीती मेश्राम (माजी सरपंच ढाकणी ), मुकेश हलमारे (शहर अध्यख ओबीसी आघाडी भाजप), प्रीतम मेश्राम ( महामंत्री अनुसूचित जाती आघाडी भाजप), गायत्रीताई बेदी ( ग्रा. प. सदस्या ), शालीक रकसे ( ग्रा. प. सदस्य ), वीणाताई डोम्बळे ( ग्रा. प. सदस्या ), कुंदाताई रिनाईत ( ग्रा. प. सदस्या ), दिनेश मेश्राम ( ग्रा. प. सदस्य ), गीताताई सोनवाने ( ग्रा. प. सदस्या ), अरुणाताई गणवीर, समित टेम्भूर्णे ( ग्रा. प. सदस्य ), बळीरामजी शरणागत ( माजी ग्रा. प. सदस्य ) उपस्थित होते.