तालुक्यातील युवकांसाठी करियर प्लानिंग कार्यशाळा-अदानी फाऊंडेशनचा उपक्रम

0
19
तिरोडा,दि.२१ः-तालुक्यातील युवकासांठी अदानी फाऊंडेशनच्यावतीने युवकांना आपल्या जिवनाची दिशा ठरविण्यासाठी करियर प्लानिग दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अदानी पावर महाराष्ट्र लि.तिरोडा येथे नुकतेच करण्यात आले होते.ही कार्याशाळा अदानी पॉवर महा.लि. तिरोडाचे प्रमुख सी.पी.शाहू यांच्या मार्गदर्शनात अदानी फाऊंडेशन प्रमुख नितिन शिराळकर,सुरक्षा विभागप्रमुख पी.सुर्यकिरण यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील मार्गदर्शिका किर्ती मुत्रेजा हजर होत्या.यावेळी सी.पी.शाहू यांनी युवकांना मोठे होण्यासाठी स्वप्न बघण्याची आवश्यकता असल्याचे सांगत यशस्वी उद्योगपतींची उदाहरणे दिली.श्रीमती किर्ती मुत्रेजा यांनी विविध उदाहरण सांगत कृतीच्या माध्यमातून युवकांना कौशल्यविकास कसे घडवायचे आणि आपले ध्येय ठरविण्यासाठी काय करावे लागते याबद्दल माहिती दिली.कार्यशाळेला तालुक्यातील मानवता हायस्कुल बेरडीपार,गणेश हायस्कुल गुमाधावडा,आदिवासी आश्रमशाळा मजितपूर येथील ३०० विद्यार्थी उपस्थित होते.संचालन राहुल राजेव यांनी केले.प्रास्तविक नितिन शिराळकर यांनी केले.आयोजनासाठी एचआर विभागासह अदानी फाऊंडेशनच्या सर्व कर्मचाèयांनी सहकार्य केले.