लोकसभा निवडणूक : दोन दिवसात 102 अर्जाची उचल,२ उमेदवारी अर्ज दाखल 

0
17

 भंडारादि. 19 – भंडारा – गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज दुसऱ्या दिवशी एकूण 26 उमेदवारांनी 55 अर्जाची उचल केली. दोन दिवसात एकूण 46  उमेदवारांनी  102 अर्ज घेतले. आज दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज  दाखल केले आहेत. यात पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे भिमराव दुर्योधन बोरकर व सुहास अनिल फुंडे, अपक्ष यांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज उचल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे. विकास देवचंद मदनकर भाजपा-1, प्रकाश गणपतराव मालगावे भाजपा-4, पुंडलिक श्यामराव निखाडे ओबीसीएनटी पार्टी2, चनिराम लक्ष्मन मेश्राम अपक्ष-4, सुखराम देशकर भारिप-2, सतिश फुलबांधे अपक्ष-1, डॉ. विजया राजेश नंदुरकर बसपा-2, डॉ. राजेश कवडू नंदुरकर बीएसपी-1, विकास यशवंत गेडाम-1, प्रशांत श्यामसुंदर मिश्रा अपक्ष-1, कुलदिपसिंह विरसिह बाच्छील, प्रहार/अपक्ष-4, रमेश खोब्रागडे अपक्ष-1, अमरदास ईश्वरकर बळीराजा पार्टी-1, प्रमोद हिरामन गजभिये प्रहार संघटना-2, विजय खेडीकर अपक्ष-3, रविशंकर शर्मा अपक्ष-3, राजकुमार भेलावे पिपल्स रिपब्लीक पार्टी-4, महादेव महाजन अपक्ष/भाजपा-2, देविदास लांजेवार विदर्भ आंदोलन समिती-4, अजित राम आस्वले अपक्ष/भाजपा-1, शिल्पा राम आस्वले भाजपा-1, राकेश चोपकर स्वाभिमानी संघटना-1, इंद्रकुमार हेमराज राही काँग्रेस-2, डॉ. सुनिल संपत चवळे अपक्ष-2, गौरीशंकर सुरेश मोटघरे अपक्ष-1 व अतुल शरदचंद्र हलमारे भाजपा/सर्वदलीय/अपक्ष/राजद/एनडीए-4 असे एकूण 26 उमेदवारांनी 55 अर्जाची उचल केली.